कतार : भारतीयांच्या फाशीला स्थगिती

नवी दिल्ली, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : कतारने ताब्यात घेतलेल्या आठ भारतीय खलाशांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. दोषी आढळलेल्या भारतीयांना त्यांच्या गुन्ह्याच्या स्वरुपानुसार तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. याआधी हेरगिरीचा ठपका ठेवून कतारने आठ भारतीय खलाशांना ताब्यात घेतले होते. या खलाशांना गुपचूप ताब्यात घेण्यात आले. खलाशांना ताब्यात घेतल्याची माहिती भारत सरकारला दिली गेली नव्हती. ताब्यात घेतलेल्या […]

कतार : भारतीयांच्या फाशीला स्थगिती

नवी दिल्ली, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : कतारने ताब्यात घेतलेल्या आठ भारतीय खलाशांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. दोषी आढळलेल्या भारतीयांना त्यांच्या गुन्ह्याच्या स्वरुपानुसार तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. याआधी हेरगिरीचा ठपका ठेवून कतारने आठ भारतीय खलाशांना ताब्यात घेतले होते. या खलाशांना गुपचूप ताब्यात घेण्यात आले. खलाशांना ताब्यात घेतल्याची माहिती भारत सरकारला दिली गेली नव्हती. ताब्यात घेतलेल्या खलाशांना वर्षभरानंतर दोषी ठरवून फाशीची शिक्षा देण्यात आली. या शिक्षेची माहिती मिळताच भारत सरकारने कतारशी चर्चा सुरू केली. सरकारने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि कतारने आठ भारतीय खलाशांच्या फाशीला स्थगिती दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number