बिहारमध्ये सत्तांतराची शक्यता

पाटणा, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : बिहारमध्ये सत्तांतराची शक्यता वाढली आहे. सत्ताधारी महाआघाडीतील आमदारांचा मोठा गट पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. आमदारांच्या गुप्त बैठका सुरू आहेत. पुढील २४ ते ४८ तासांत जनता दल संयुक्त अर्थात जेडीयूचे लोकसभेतील नेते राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह पदाचा राजीनामा सादर करणार आहेत. हा राजीनामा सादर झाल्यानंतर बिहारमधील राजकीय नाट्याला […]

बिहारमध्ये सत्तांतराची शक्यता

पाटणा, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : बिहारमध्ये सत्तांतराची शक्यता वाढली आहे. सत्ताधारी महाआघाडीतील आमदारांचा मोठा गट पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. आमदारांच्या गुप्त बैठका सुरू आहेत. पुढील २४ ते ४८ तासांत जनता दल संयुक्त अर्थात जेडीयूचे लोकसभेतील नेते राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह पदाचा राजीनामा सादर करणार आहेत. हा राजीनामा सादर झाल्यानंतर बिहारमधील राजकीय नाट्याला वेग येण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीत मोदी विरोधी आघाडीची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार म्हणून सुचवले. खर्गे यांनी हा प्रस्ताव फेटाळला. यानंतर नव्या पर्यायावर चर्चा झाली नाही. जनता दल संयुक्तने नितीश कुमार यांचे नाव सुचवण्याचा प्रयत्न केला. पण कोणत्याही प्रस्तावावर एकमत झाले नाही. नितीश कुमार यांना अनेक पक्षांकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. यानंतर बिहारमध्ये आमदारांच्या गुप्त बैठका झाल्या. या बैठकांमुळे बिहारमध्ये काय होणार यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number