नाशिक, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिक शहरात असलेल्या नागरिकांना पोलिसांकडे तक्रार करणे अथवा पोलिसांशी संवाद साधणे आता एकदम सोपे होणार आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांचा व्हॉट्सअॅप क्रमांक सार्वजनिक केला आहे. नागरिक थेट या व्हॉट्सअॅप तक्रार नोंदवू शकतील. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हा प्रयोग केला आहे. व्हॉट्सअॅपवर तक्रार नोंदवणाऱ्याचे नाव गुप्त राखले जाणार आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा व्हॉट्सअॅप क्रमांक : ९९२३३२३३११