अजित पवारांच्या निर्णयाने मित्रपक्ष नाराज

पुणे, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत आठशे कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. कोणतेही इतिवृत्त सादर झाले नसताना कामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीला उपस्थित असलेल्या कोणाशीही या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली नाही. तडकाफडकी घेण्यात आलेल्या या निर्णयाला पुण्यातील शिवसेना आणि […]

अजित पवारांच्या निर्णयाने मित्रपक्ष नाराज

पुणे, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत आठशे कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. कोणतेही इतिवृत्त सादर झाले नसताना कामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीला उपस्थित असलेल्या कोणाशीही या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली नाही. तडकाफडकी घेण्यात आलेल्या या निर्णयाला पुण्यातील शिवसेना आणि भाजपाकडून विरोध करण्यात आला. नियमांचे पालन करून निर्णय घ्यावे, अशी मागणी शिवसेना आणि भाजपाने केली. मंजुरी दिलेली ८०० कोटींची कामं रद्द करा नाहीतर न्यायालयात जाऊ असा इशारा मित्रपक्षांनी पालकमंत्र्यांना दिला. कामं रद्द करा, असे निवेदन मित्रपक्षांनीच जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिले.

अजित पवारांचा निर्णय, मित्रपक्ष नाराज
बैठकीत पवारांकडून ८०० कोटीची कामं मंजूर
कामं रद्द करण्याची भाजपा – शिवसेनेची मागणी
पुण्यात अजित पवारांविरोधात मित्रपक्ष आक्रमक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number