एसटीमध्ये राखीव आसन क्रमांकात बदल

पुणे, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधील राखीव आसनांच्या क्रमांकामध्ये नवीन वर्षात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता विधीमंडळ सदस्यांना एक आणि दोन ऐवजी सात व आठ क्रमांक राखीव असणार आहे. तर दिव्यांगासाठी पाठीमागे असलेले राखीव आसन क्रमांक पुढे आणण्यात आले आहेत. येत्या एक जानेवारीपासून नवीन राखीव आसन क्रमांक लागू […]

एसटीमध्ये राखीव आसन क्रमांकात बदल

पुणे, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधील राखीव आसनांच्या क्रमांकामध्ये नवीन वर्षात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता विधीमंडळ सदस्यांना एक आणि दोन ऐवजी सात व आठ क्रमांक राखीव असणार आहे. तर दिव्यांगासाठी पाठीमागे असलेले राखीव आसन क्रमांक पुढे आणण्यात आले आहेत.

येत्या एक जानेवारीपासून नवीन राखीव आसन क्रमांक लागू केले जाणार आहेत. एसटी महामंडळाच्या विविध बसमध्ये विधीमंडळ सदस्य, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, महिला, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, एसटी कर्मचारी यांच्यासाठी राखीव आसन व्यवस्था करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने नव्याने कार्यप्रणाली कार्यान्वित केलेली आहे.

जुन्या कार्यप्रणालीमध्ये बसमधील आसनाची रचना वेगवेगळी आहे. तसेच, बस प्रकारानुसार विविध सामाजिक घटकांना विविध बसेसमध्ये आसन क्रमांक देखील वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. राखीव आसन व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एसटी महामंडळाकडून एक जानेवारीपासून राखीव आसन क्रमांकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number