केंद्रात कोणाची सत्ता येणार ?

नवी दिल्ली, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : केंद्रात कोणाची सत्ता येणार याचा अंदाज घेण्यासाठी ‘सी व्होटर’ने एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए मोदी विरोधी गटावर मात करताना दिसत आहे. कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपा चमकदार कामगिरी करेल, असे हे सर्वेक्षण सांगते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि बिहारमध्ये महाआघाडी चमकदार कामगिरी करेल […]

केंद्रात कोणाची सत्ता येणार ?

नवी दिल्ली, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : केंद्रात कोणाची सत्ता येणार याचा अंदाज घेण्यासाठी ‘सी व्होटर’ने एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए मोदी विरोधी गटावर मात करताना दिसत आहे. कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपा चमकदार कामगिरी करेल, असे हे सर्वेक्षण सांगते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि बिहारमध्ये महाआघाडी चमकदार कामगिरी करेल असेही हे सर्वेक्षण सांगते. सर्वेक्षणात ५९ टक्के नागरिकांची पसंती नरेंद्र मोदींना तर ३२ टक्के नागरिकांची पसंती ही राहुल गांधींना दिसते.

बिहारमध्ये महाआघाडीला ४३ टक्के तर भाजपाला ३९ टक्के मते, इतरांना १८ टक्के मते. महाआघाडीला २१ ते २३ जागा.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला ४४ टक्के तर भाजपाला ३९ टक्के मते. तृणमूलला २३ ते २५ जागा.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ४१ टक्के, भाजपाला ३७ टक्के, इतरांना २२ टक्के मते.
पंजाबमध्ये काँग्रेसला २७ टक्के, आपला २५ टक्के, भाजपाला १६ टक्के, शिरोमणी अकाली दलाला १४ टक्के, इतरांना १८ टक्के मते.

‘सी व्होटर’चा अंदाज भाजपाने फेटाळला

महाराष्ट्रात युतीला ४० पेक्षा जास्त जागा मिळणार असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कोणीही सर्वेक्षण करू दे, सगळीकडे मोदींचीच हवा आहे. यामुळे राज्यात युती ४० पेक्षा जागा मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number