मुंबई, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्याची शक्यता वाढली आहे.
फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. उद्धव सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. शिंदे सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना, ‘आम्हाला विश्वास आहे की, लवकरात लवकर सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेल’, असे मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले.