‘बीडच्या शिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करा’

बीड, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : शनिवारी बीड शहरातील मराठी इंग्रजी माध्यमातील सगळ्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीड शहरालगत शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे आणि यावेळी एकीकडे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केलेला असतानाच शहरांमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली निघणार आहे त्या पार्श्वभूमीवर शहरातील सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आली […]

‘बीडच्या शिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करा’

बीड, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : शनिवारी बीड शहरातील मराठी इंग्रजी माध्यमातील सगळ्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीड शहरालगत शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे आणि यावेळी एकीकडे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केलेला असतानाच शहरांमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली निघणार आहे त्या पार्श्वभूमीवर शहरातील सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शाळा बंद ठेवण्याविरोधात सदावर्ते आक्रमक झाले आहेत. जरांगे यांच्यासाठी मुलांना वेठीस का धरले जातेय?’ असा सवाल देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

गुणरत्न सदावर्तेंचा आदेशाला विरोध…
बीड शहरात आज मनोज जरांगे यांची सभा होणार असल्याने शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण अधिकारी यांनी काढले आहेत. मात्र,”राईट टू एज्युकेशन अधिकारानुसार अशाप्रकारे शाळा बंद ठेवणे गैर आहे. त्यामुळे असा निर्णय घेणारे बीडचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांचे निलंबन केलं पाहिजे अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तसेच, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मध्य भोजनापासून भूके राहावे लागेल. त्यामुळे सदावर्ते यांनी शालेय शिक्षण मंत्री, मराठवाडा विभागीय आयुक्त तसेच शिक्षणाधिकारी यांना पत्र लिहून हा आदेश मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची” मागणी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number