रविवारी तिन्ही मार्गांवर ब्लॉक

मुंबई, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मेगाब्लॉक हा माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशीदरम्यान असणार आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी दिवसा या मार्गावर कोणताही ब्लॉक असणार नाही. रेल्वेरूळांच्या देखभाल-दुरुस्तीसह अभियांत्रिकी कामासाठी ब्लॉक घेण्यात येतो. ब्लॉकमुळे काही लोकल […]

रविवारी तिन्ही मार्गांवर ब्लॉक

मुंबई, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मेगाब्लॉक हा माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशीदरम्यान असणार आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी दिवसा या मार्गावर कोणताही ब्लॉक असणार नाही. रेल्वेरूळांच्या देखभाल-दुरुस्तीसह अभियांत्रिकी कामासाठी ब्लॉक घेण्यात येतो. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येत असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

स्थानक – माटुंगा-मुलुंड
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५
परिणाम – ब्लॉकवेळेत अप-डाउन जलद लोकल अप-डाउन धीम्या मार्गावरून धावणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे

स्थानक – पनवेल-वाशी
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
परिणाम – पनवेल-सीएसएमटी आणि ठाणे-पनवेल अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी, ठाणे ते नेरूळ/वाशी आणि बेलापूर/नेरूळ ते खारकोपर स्थानकांदरम्यान लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक – बोरिवली-भाईंदर
मार्ग – अप आणि डाउन धीमा
वेळ – शनिवारी मध्यरात्री १२.३५ ते रविवारी पहाटे ४.३५

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number