राहुल गांधींना भोवणार मोदींवरील टिप्पणी ?

नवी दिल्ली, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केलेली एक टिप्पणी भोवण्याची शक्यता आहे. राहुल यांनी २२ नोव्हेंबर २०२३ रोजी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांच्यावर ‘पिकपॉकेट’ अशी टिप्पणी केली होती. या प्रकरणी दिल्लीच्या उच्च न्यायालयाने गुरुवार २१ डिसेंबर २०२३ रोजी निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. […]

राहुल गांधींना भोवणार मोदींवरील टिप्पणी ?

नवी दिल्ली, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केलेली एक टिप्पणी भोवण्याची शक्यता आहे. राहुल यांनी २२ नोव्हेंबर २०२३ रोजी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांच्यावर ‘पिकपॉकेट’ अशी टिप्पणी केली होती. या प्रकरणी दिल्लीच्या उच्च न्यायालयाने गुरुवार २१ डिसेंबर २०२३ रोजी निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे निर्देश दिले.

सुनावणीवेळी राहुल यांनी केलेले विधान योग्य नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. निवडणूक आयोगाला आठ आठवड्यांच्या आत यावर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिल्लीच्या उच्च न्यायालयाने दिले.

राहुल गांधी यांनी राजकीय सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उद्योगपती गौतम अदानी यांना “पिकपॉकेट्स” संबोधले होते. या टिप्पणीविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाला निर्देश दिले.

याआधी मोदी अडनावाच्या बदनामी प्रकरणी सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवले होते. उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही प्रकरणात दोषी आढळल्यास आणि दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळाची शिक्षा ठोठावण्यात आल्यास लोकप्रतिनिधित्व रद्द होते. यामुळे सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली आणि लोकसभा सचिवालयाने राहुल यांना खासदारकी पुन्हा बहाल केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number