पार्लचा सामना निर्णायक ठरणार

पार्ल, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी – २० मालिका बरोबरीत सुटली. यानंतर सुरू झालेल्या एकदिवसीय मालिकेत दोन सामन्यांनंतर १ – १ अशी बरोबरी झाली आहे. भारताने पहिला एकदिवसीय सामना आठ गडी राखून जिंकला तर दक्षिण आफ्रिकेने दुसरा एकदिवसीय सामना आठ गडी राखून जिंकला. मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक एकदिवसीय सामना […]

पार्लचा सामना निर्णायक ठरणार

पार्ल, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी – २० मालिका बरोबरीत सुटली. यानंतर सुरू झालेल्या एकदिवसीय मालिकेत दोन सामन्यांनंतर १ – १ अशी बरोबरी झाली आहे. भारताने पहिला एकदिवसीय सामना आठ गडी राखून जिंकला तर दक्षिण आफ्रिकेने दुसरा एकदिवसीय सामना आठ गडी राखून जिंकला. मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक एकदिवसीय सामना पार्ल येथील बोलंड पार्कमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका २ – १ अशी जिंकेल.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात काय झाले ?

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ४६.२ षटकांत सर्वबाद २११ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने ४२.३ षटकांत २ बाद २१५ धावा करत सामना आठ गडी राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेकडून टोनी डी झॉर्झीने नाबाद ११९ धावा केल्या. तो सामनावीर झाला.

एकदिवसीय मालिका आणि निकाल

रविवार १७ डिसेंबर २०२३ – पहिला एकदिवसीय सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग – भारताचा ८ गडी राखून विजय
मंगळवार १९ डिसेंबर २०२३ – दुसरा एकदिवसीय सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ – दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून विजय
गुरुवार २१ डिसेंबर २०२३ – तिसरा एकदिवसीय सामना, बोलंड पार्क, पार्ल

तिसरा एकदिवसीय सामना

भारताचा संभाव्य संघ : केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार, युझवेंद्र चहल, रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप.

दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ : एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर डुसेन , डेव्हिड मिलर, विआन मल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी, लिझाड विलियम्स, काइल व्हेरेने, ओटनील बार्टमन, मिहलाली मपोंगवाना

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number