दुबई, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ अर्थात आयपीएल २०२४ साठी यंदा दुबईत खेळाडूंचा लिलाव होणार आहे. हा लिलाव मंगळवार १९ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल. यंदा ३३३ खेळाडूंचा लिलाव केला जाईल. लिलावात सहभागी होणार असलेल्यांपैकी २१४ क्रिकेटपटू भारतीय तर ११९ जण परदेशी खेळाडू आहेत. सर्व संघांकडे मिळून ७७ स्लॉट उपलब्ध आहेत. यापैकी ३० स्लॉटसाठी परदेशी खेळाडूंचा विचार होऊ शकेल.
गुजरात टायटन्सकडे सर्वाधिक ३८ कोटी १५ लाख रुपये आहेत. सर्वाधिक १२ स्लॉट कोलकाता नाईटरायडर्सकडे आहेत. यंदाच्या लिलावासाठी २३ क्रिकेटपटूंचा २ कोटी किमान किंमत अर्थात दोन कोटींची बेस्ड प्राईज असलेल्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
कोणत्या संघाकडे लिलावात सहभागी होण्यासाठी किती पैसा उपलब्ध ?
चेन्नई सुपरकिंग्स : ३१ कोटी ४० लाख रुपये
दिल्ली कॅपिटल्स : २८ कोटी ९५ लाख रुपये
गुजरात टायटन्स : ३८ कोटी १५ लाख रुपये
कोलकाता नाईट रायडर्स : ३२ कोटी ७० लाख रुपये
लखनऊ सुपर जायंट्स : १३ कोटी १५ लाख रुपये
मुंबई इंडियन्स : १७ कोटी ७५ लाख रुपये
पंजाब किंग्स : २९ कोटी १० लाख रुपये
राजस्थान रॉयल्स : १४ कोटी ५० लाख रुपये
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २३ कोटी २५ लाख रुपये
सनरायझर्स हैदराबाद : ३४ कोटी रुपये