नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा

नागपूर, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : गडचिरोली भागात नक्षल पीडितांमुळे विस्थापित झालेल्या तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नक्षल त्रासाला कंटाळून जे विस्थापित होतात तसेच नक्षलवादी विचारसरणी त्यागून जे शरण येतात, अशा सर्वांचे पुनर्वसन युद्धपातळीवर होण्याची गरज आहे. या प्रक्रीयेसाठी येणारा खर्च जिल्हा नियोजन […]

नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा

नागपूर, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : गडचिरोली भागात नक्षल पीडितांमुळे विस्थापित झालेल्या तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नक्षल त्रासाला कंटाळून जे विस्थापित होतात तसेच नक्षलवादी विचारसरणी त्यागून जे शरण येतात, अशा सर्वांचे पुनर्वसन युद्धपातळीवर होण्याची गरज आहे. या प्रक्रीयेसाठी येणारा खर्च जिल्हा नियोजन योजनेच्या माध्यमातून करण्यात यावा. विशेष पोलीस मोहिमांमध्ये शहीद झालेल्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नेमणुका तातडीने करण्यात याव्यात. नागपूर, गडचिरोली मार्गावरील मॉडर्न फायरिंग रेंजचे काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे. गडचिरोली येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या पोलीस स्थानकांच्या २५ अधिकारी व ५०० कर्मचाऱ्यांच्या पद निर्मितीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या सर्व नेमणुका स्थानिक पातळीवर होणार आहेत.

महाराष्ट्र पब्लिक सिक्युरिटी अॅक्ट – हे जनसुरक्षा विधेयक लवकरात लवकर आणण्याबाबतही विचार विनिमय झाला. शहरी माओवादी रोखण्यासाठी हे विधेयक महत्वाचे ठरणार आहे. तसेच मायनिंग कॉरिडॉरच्या रस्त्यांचा विकास तसेच या परिसरातील मोबाईल टॉवर्सची कामे वेगाने पूर्ण व्हावीत याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या जिल्ह्यांतर्गत दळणवळण व्यवस्था राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या माध्यमातून अधिक सक्षम करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number