मुंबई, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर रविवार १७ डिसेंबर २०२३ रोजी मेगाब्लॉक आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर, ट्रान्सहार्बर आणि उरण मार्गावर रविवारी मेगाब्लॉक नाही.
मध्य रेल्वे मुख्य मार्ग
ठाणे ते कल्याण जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावर
सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वे
माहिम ते सांताक्रुझ जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावर
सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक