मुंबईत १८ डिसेंबरला पाणीकपात

मुंबई, १५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई महापालिका मलबाह हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम करणार आहे. या कामासाठी महापालिकेने स्थापन केलेली तज्ज्ञांची समिती मलबार हिल जलाशयामधील कप्पा-१ची अंतर्गत पाहणी करणार आहे. ही पाहणी सोमवार १८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत होणार आहे. या पाहणीसाठी कप्पा रिकामा केला जाईल. यामुळे मुंबई महापालिकेच्या पाच […]

मुंबईत १८ डिसेंबरला पाणीकपात

मुंबई, १५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई महापालिका मलबाह हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम करणार आहे. या कामासाठी महापालिकेने स्थापन केलेली तज्ज्ञांची समिती मलबार हिल जलाशयामधील कप्पा-१ची अंतर्गत पाहणी करणार आहे. ही पाहणी सोमवार १८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत होणार आहे. या पाहणीसाठी कप्पा रिकामा केला जाईल. यामुळे मुंबई महापालिकेच्या पाच वॉर्डमध्ये दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. नरिमन पॉइंट, कफ परेड, आंबेडकरनगर, मिलिट्री झोनसह काळबादेवी, चिराबाझार, ताडदेवसह अन्य भाग, मुंबई सेंट्रल, गिरगाव, ग्रँट रोड आदी भाग, तसेच जी उत्तरमधील दादर पश्चिम, धारावी आणि माहीम परिसर, जी दक्षिण विभागातील वरळी, लोअर परळ, प्रभादेवी, एल्फिन्स्टनच्या पश्चिमेकडील भागात पाणीकपात केली जाणार आहे. पुनर्बांधणीमुळे ३८९ झाडे, मलबार टेकडी परिसरातील रस्ते बाधित होतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number