परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल

नागपूर, १४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : विविध उद्योगांद्वारे परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे. मागील तीन महिन्यांत राज्यात २८ हजार ८८९ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. विधान परिषदेत कोकण विभागातील नैना या प्रकल्पावर झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान सामंत यांनी ही माहिती दिली. करमोली येथे तब्बल ५०० कोटी […]

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल

नागपूर, १४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : विविध उद्योगांद्वारे परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे. मागील तीन महिन्यांत राज्यात २८ हजार ८८९ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. विधान परिषदेत कोकण विभागातील नैना या प्रकल्पावर झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान सामंत यांनी ही माहिती दिली. करमोली येथे तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करून देशातील सर्वात मोठे आणि सर्व सुविधा युक्त कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली. याशिवाय अन्य जिल्ह्यांमध्येही ही केंद्रे उभारली जातील, यात नागपूरचाही समावेश असल्याचे सामंतांनी स्पष्ट केले. तसेच १५ जिल्ह्यांमध्ये उद्योग भवन बांधले जाणार असून त्यासाठी १५० कोटी रुपये दिले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number