नाशिक, १४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : केंद्र सरकारने देशातील कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे देशातील कांद्याच्या पुरवठ्यात वाढ झाली आहे. कांद्याचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागताच बाजारसमितीतील कांद्याच्या दरात घसरण होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी १ क्विंटल कांदा किमान साडेतीन ते चार हजार रुपयांच्या दराने विकला जात होता. आता १ क्विंटल कांदा किमान दीड ते दोन हजार रुपयांच्या दराने विकला जात आहे. दर नियंत्रणात येऊ लागले आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. पण सरकारच्या निर्यातबंदीला व्यापाऱ्यांच्या संघटना विरोध करत आहेत. शेतकरी पण पिकाला जास्त भाव मिळत नसल्यामुळे नाराज असल्याचे वृत्त आहे. ग्राहक मात्र कांद्याचे दर घसरू लागल्याचे बघून आनंदात आहे.