दीपक चहर तिसऱ्या सामन्यात खेळणार ?

जोहान्सबर्ग, १३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी – २० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियम लागू झाला. या नियमानुसार दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. आता तिसऱ्या आणि निर्णायक सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. पहिल्या दोन सामन्यात न खेळलेला […]

दीपक चहर तिसऱ्या सामन्यात खेळणार ?

जोहान्सबर्ग, १३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी – २० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियम लागू झाला. या नियमानुसार दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. आता तिसऱ्या आणि निर्णायक सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. पहिल्या दोन सामन्यात न खेळलेला दीपक चहर तिसऱ्या सामन्यात भारताकडून खेळण्याची शक्यता आहे.

वडिलांच्या आजारपणामुळे दीपक चहर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर उशिरा पोहोचला आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताकडून खेळण्याची शक्यता आहे. दीपक चेंडू दोन्ही बाजूंना सहज स्विंग करू शकतो. गोलंदाजी प्रमाणेच दीपक फलंदाजीही चांगल्याप्रकारे करू शकतो. याच कारणामुळे निर्णायक सामन्यात दीपकचा समावेश करून भारतीय संघ स्वतःची बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करेल, अशी चर्चा आहे. निर्णायक सामना जोहान्सबर्ग येथील न्यू वाँडर्स स्टेडियमवर होणार आहे. हा सामना गुरुवार १४ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेआठ वाजता सुरू होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे.

भारतीय संघ, टी – २० : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मुकेश कुमार, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

१. रविवार १० डिसेंबर २०२३ – पहिला टी – २० सामना, किंग्समीड, डर्बन – पावसामुळे रद्द
२. मंगळवार १२ डिसेंबर २०२३ – दुसरा टी – २० सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ – डकवर्थ लुईसनुसार दक्षिण आफ्रिकाचा पाच गडी राखून विजय
३. गुरुवार १४ डिसेंबर २०२३ – तिसरा टी – २० सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number