ठाण्यात गुरुवारी पाणीबाणी

ठाणे, १२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ठाण्यातील सिद्धेश्वर जलकुंभाच्या जलवाहिनीचे तांत्रिक काम केले जाणार आहे. यासाठी गुरुवार १४ डिसेंबर २०२३ रोजी बारा तासांसाठी शहरातील काही भागांचा पाण्याचा पुरवठा बंद असेल. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असे आवाहन ठाणे महापालिका प्रशासनाने केले आहे. ठाणे पालिकेच्या उथळसर प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या सिद्धेश्वर जलकुंभाची इनलेट जलवाहिनीच्या ५०० मिमी व्यासाचा व्हॉल्व्ह […]

ठाण्यात गुरुवारी पाणीबाणी

ठाणे, १२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ठाण्यातील सिद्धेश्वर जलकुंभाच्या जलवाहिनीचे तांत्रिक काम केले जाणार आहे. यासाठी गुरुवार १४ डिसेंबर २०२३ रोजी बारा तासांसाठी शहरातील काही भागांचा पाण्याचा पुरवठा बंद असेल. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असे आवाहन ठाणे महापालिका प्रशासनाने केले आहे. ठाणे पालिकेच्या उथळसर प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या सिद्धेश्वर जलकुंभाची इनलेट जलवाहिनीच्या ५०० मिमी व्यासाचा व्हॉल्व्ह बदलणे आवश्यक आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी हे काम हाती घेतले जाणार असून सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत एकूण १२ तासांसाठी पाण्याचा पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या काळात सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, समतानगर, दोस्ती, म्हाडा, विवियाना मॉल व आकृती आदी जलकुंभाच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरातील पाण्याचा पुरवठा १२ तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number