मुंबई, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रीय तपास संस्थेने आयसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवायांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कारवाई केली. संस्थेने ४४ ठिकाणी धाडी टाकल्या. यापैकी सर्वाधिक धाडी महाराष्ट्रात टाकण्यात आल्या. महाराष्ट्रातील पडघा – बोरिवली, ठाणे, मीरा रोड आणि पुणे तर कर्नाटकमधील बंगळुरूत ठिकठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. राष्ट्रीय तपास संस्थेने कारवाई करून १५ जणांना अटक केली. मोठा शस्त्रसाठा, दारूगोळा, धारदार शस्त्रे, रोख रक्कम, कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, स्मार्टफोन जप्त केले.