इंदापूर, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : सभास्थळी जात असताना भाजपाच्या गोपीचंद पडळकरांवर चप्पल फेकण्यात आली. यानंतर काही आंदोलकांनी पडळकर परत जा अशा स्वरुपाच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पडळकर काय म्हणाले ?
‘मागासवर्ग आयोगावर असताना मी अनेक गोष्टी पाहिल्या. आम्ही दाखला काढण्यासाठी गेलो तर तीन माहिने लागतात. पण राज्यात काही दिवसात कुणबी आरक्षणाचे प्रमाणपत्र लगेच दिले जाते. राज्य मागासवर्ग आयोगाचे अॅफिडेव्हिट सादर करण्याची प्रक्रियाच होत नाही. एक निवृत्त न्यायाधीश यामध्ये ढवळाढवळ करत आहे. ओबीसी आरक्षण घालवण्याचा कट सुरु आहे”, असे पडळकर म्हणाले.