मुंबई, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल होणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांकांमध्ये बदल होणार नाही. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक एक आता दादरचा फलाट क्रमांक आठ म्हणून ओळखला जाणार आहे. हा बदल शनिवार ९ डिसेंबर २०२३ पासून लागू होणार आहे.
मध्य रेल्वेचा क्रमांक दोनचा फलाट काही आठवड्यांपूर्वी रद्द झाला आहे. सध्या मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात १, ३, ४, ५, ६, ७, ८ क्रमांकांचे फलाट अस्तित्वात आहेत. या फलाटांचे क्रमांक शनिवार ९ डिसेंबर २०२३ पासून बदलणार आहेत.
मध्य रेल्वेचे दादर स्थानक, जुना फलाट क्रमांक – मध्य रेल्वेचे दादर स्थानक, नवा फलाट क्रमांक
१ – ८
३ – ९
४ – १०
५ – ११
६ – १२
७ – १३
८ – १४