नमो महारोजगार मेळावा ‘या’ दिवशी होणार

नागपूर, ७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन दिनांक ९ आणि १० सेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. ‘नमो महारोजगार मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजता, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात विविध पदांसाठी ७०० नियुक्त्या होणार […]

नमो महारोजगार मेळावा ‘या’ दिवशी होणार

नागपूर, ७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन दिनांक ९ आणि १० सेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. ‘नमो महारोजगार मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजता, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात विविध पदांसाठी ७०० नियुक्त्या होणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल ४० हजारांहून अधिक जागांसाठी पदभरती होणार आहे. रोजगार महामेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नमो महारोजगार बटनवर क्लिक करून, विचारलेली माहिती संपूर्णपणे भरून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number