शिर्डी, ७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळ पिंपरी गावात दलित कुटुंबाला मारहाण झाल्याचे वृत्त आहे. ग्रामसभा दलित कुटुंबावर बहिष्कार घालण्यात आल्याचेही वृत्त आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातील गावात ही धक्कादायक घटना घडली. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर हे वृत्त आले आहे. यामुळे अधिवेशनात या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
अहवाल मागवला
दलित कुटुंबाला मिळालेल्या वागणुकीप्रकरणी अहवाल मागवला आहे. पूर्ण माहिती हाती आल्यानंतर दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. ते ‘जय महाराष्ट्र’च्या प्रतिनिधीशी बोलत होते.