सोमवारी (दि. ३ डिसेंबर २०२३) पाच राज्यांतील विधानसभा निवडणूका पार पडल्या. यापैकी चार राज्यांच्या मतमोजणीतून आलेल्या निकालामध्ये भाजपाची सरशी पाहायला मिळाली. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर तेलंगणात भाजपा तिसऱ्या स्थानी आहे. दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी भाजपा मुख्यालयाला भेट दिली. यावेळी बोलत असताना पंतप्रधान मोदींनी जनतेचे आभार मानले.
काय म्हणाले मोदी ?
‘सर्वांची सोबत सर्वांचा विकास ही भावना आज जिंकली’
‘हा प्रामाणिकपणाचा विजय’
‘देशात फक्त चारच जाती’
‘महिला, युवा, शेतकरी आणि गरिब’
‘त्यांचा विकास हेच आमचे ध्येय’
‘हा विजय महिलांचा, युवकांचा, गरिबांचा, शेतकऱ्यांचा’
‘महिला आरक्षणाच्या धोरणामुळे भाजपाला समर्थन’
‘छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थानातली सरकारे भ्रष्ट’
‘भ्रष्ट सरकारे जनतेने नाकारली’
‘आदिवासींनी काँग्रेसला नाकारले’
‘या विजयामुळे २०२४ च्या विजयाची शाश्वती’
‘आजचा निकाल मोदी विरोधकांसाठी धडा’
‘गरिबांच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्यांना धडा शिकवला’
‘भारतीय अर्थव्यवस्था जलद गतीने विकास करतेय’
‘भारत वेगाने डिजिटल होत आहे’
‘जनतेची स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी तपस्या’
‘देशाचा वेगाने विकास होतोय’
‘देशविरोधी शक्ती आता पुन्हा एकत्र येईल’
‘त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपा नेहमीच समर्थ’
पंतप्रधान मोदी जनतेसमोर नतमस्तक
महिला, युवा, शेतकऱ्यांचे पंतप्रधानांनी मानले आभार