पुसद, २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप होत आहेत. या परिस्थितीत माजी खासदार, ज्येष्ठ ओबीसी नेते, आरक्षणाचे अभ्यासक, हरिभाऊ राठोड यांनी पुढाकार घेऊन संभाजी महाराज छत्रपती यांच्याबरोबर विस्तृत चर्चा केली. ही चर्चा गेल्या आठवड्यात झाली. आता त्याचा पुढील भाग म्हणून आरक्षणाचा राठोड फार्म्युला आगामी भेटीत जरांगे यांच्या समोर मांडला जाईल. यासाठी मनोज जरांगे पाटील आणि ज्येष्ठ ओबीसी नेते हरिभाऊ राठोड भेटून चर्चा करणार आहेत. पुसद येथे मंगळवार ५ डिसेंबर रोजी ही चर्चा होणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न यावेळी चर्चेद्वारे केला जाईल.