मुंबई, २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतमध्ये बोलताना शरद पवार यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. यावर उद्धव गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार बोलत आहेत ती भाजपाची स्क्रिप्ट असल्याचे संजय राऊत म्हणाले. भाजपाने पक्ष आणि घरं फोडली आहेत. एवढे करूनही मोठे नेते फुटत नाहीत म्हणून भाजपाने चारित्र्यहनन सुरू केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. भविष्यात महाराष्ट्रात आणि देशात आमचं सरकार येईल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.