उपमुख्यमंत्री पवारांचा संभाजीनगर दौरा रद्द

छत्रपती संभाजीनगर, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शनिवारचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती समोर येत आहे. गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उ‌द्घाटन पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगरचा […]

उपमुख्यमंत्री पवारांचा संभाजीनगर दौरा रद्द

छत्रपती संभाजीनगर, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शनिवारचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती समोर येत आहे. गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उ‌द्घाटन पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगरचा दौरा रद्द केला असल्याची माहिती समोर येत आहे. आमदार सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकास कामांचा उद्घाटनाचा आयोजन करण्यात आले होते. तसेच, ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उ‌द्घाटन पवार यांच्या हस्ते होणार होते. याचवेळी त्यांच्या याच दौऱ्याला मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. त्यामुळे, मराठा समाजाच्या विरोधामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number