रायपूर, १ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुन्हा टक्कर होणार आहे. यावेळी रायपूरमध्ये टी – २० सामना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी २० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना रायपूरमध्ये होत आहे. भारतीय वेळेनुसार शुक्रवार १ डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता सामना सुरू होणार आहे. आतापर्यंत भारताने दोन आणि ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे. मालिकेतील चौथा सामना भारताने जिंकला तर मालिका भारत जिंकेल. पण चौथा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर मालिकेतील पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे.
भारत : इशान किशन (यष्टीरक्षक) , सूर्यकुमार यादव (कर्णधार) , यशस्वी जयस्वाल , ऋतुराज गायकवाड , तिलक वर्मा , रिंकू सिंग , अक्षर पटेल , रवी बिश्नोई , अर्शदीप सिंग , आवेश खान , प्रसीध कृष्णा , दीपक चहर , श्रेयस अय्यर , श्रेयस जितेश शर्मा , मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर , शिवम दुबे
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार, यष्टीरक्षक) , ट्रॅव्हिस हेड , मॅथ्यू शॉर्ट , अॅरॉन हार्डी , बेन मॅकडरमॉट , टिम डेव्हिड , ख्रिस ग्रीन , बेन ड्वार्शुइस , नॅथन एलिस , जेसन बेहरेनडॉर्फ , तन्वीर संघा , केन रिचर्डसन , जोश फिलिप