चंद्रपूर, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : तेलंगणात विधानसभेसाठी मतदान होत आहे. या मतदानात महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चौदा गावं सहभागी झाली आहेत. ही गावं महाराष्ट्रातही विधानसभेसाठी मतदान करतात. देशात फक्त चौदा गावं आहेत जी दोन राज्यात मतदान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र शासन उदासिन आहे. गावं महाराष्ट्रात असूनही तिथल्या विकासकामांमध्ये तेलंगणा सरकार लक्ष घालत आहे. यामुळेच गावातील नागरिक तेलंगणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या विधानसभेसाठी मतदान करत आहेत. दोन्ही राज्यांच्या मतदारयादीत त्यांची नावं आहेत; असे स्थानिकांचे म्हणणे आहे.