मारुती नवलेंवर पीएफ घोटाळ्याचा आरोप

पुणे, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्युटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पुणे पोलिसात फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. नवले यांच्या कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूल मधील दीडशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून २०१९ ते २२ पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करण्यात आली. पण ही रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता मारुती […]

मारुती नवलेंवर पीएफ घोटाळ्याचा आरोप

पुणे, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्युटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पुणे पोलिसात फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

नवले यांच्या कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूल मधील दीडशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून २०१९ ते २२ पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करण्यात आली. पण ही रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता मारुती नवले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरली असा आरोप आहे. नवलेंनी सुमारे ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मारुती नवलेंवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number