नाशिक, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील चांदवड, निफाड, नांदगाव तालुक्यासह अन्य भागात गारपिटीसह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे चांदवड आणि निफाड तालुक्याच्या दौ-यावर आहेत. चांदवड तालुक्यातील बहादुरी येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी द्राक्ष बागायतदारांना दिलासा दिला. हिवाळी अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत मिळावी यासाठी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. अधिवेशनात शेतक-यांची बाजू मांडणार असेही ते म्हणाले.