समृद्धी महामार्गावर ड्रोनची नजर

नागपूर, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : समृद्धी महामार्गावर सोळा ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या आधुनिक ड्रोनची नजर असेल. हा ड्रोन २४ तास समृद्धी महामार्गावर लक्ष ठेवेल. गती मर्यादा ओलांडणारी वाहने, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारी वाहने, चुकीच्या प्रकारे ओव्हरटेक करणारी वाहने यांची नोंद करून ड्रोन त्याची माहिती वाहतूक नियंत्रण कक्षाला देणार आहे. या आधुनिक ड्रोनसाठी निविदा […]

समृद्धी महामार्गावर ड्रोनची नजर

नागपूर, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : समृद्धी महामार्गावर सोळा ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या आधुनिक ड्रोनची नजर असेल. हा ड्रोन २४ तास समृद्धी महामार्गावर लक्ष ठेवेल. गती मर्यादा ओलांडणारी वाहने, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारी वाहने, चुकीच्या प्रकारे ओव्हरटेक करणारी वाहने यांची नोंद करून ड्रोन त्याची माहिती वाहतूक नियंत्रण कक्षाला देणार आहे. या आधुनिक ड्रोनसाठी निविदा काढण्यात आली आहे. ड्रोन पुरवणाऱ्या कंपन्यांना २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. समृद्धी महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठीचा एक उपाय म्हणून आधुनिक ड्रोनचा वापर केला जाणार आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३, अपघात –

नागपूर हद्द – अपघात ६५६, मृत्यू ८०
औरंगाबाद – अपघात ३३३, मृत्यू ३६
पुणे – २२ अपघात, मृत्यू ७

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number