शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

बारामती, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : कुठे अवकाळी पाऊस तर कुठे गारपीट, काही ठिकाणी दुष्काळ अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने या परिस्थितीची दखल घेऊन तातडीने मदत द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे राज्य शासनाने संवेदनशीलतेने बघावे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्राचे कंबरडे मोडण्यासाठी दिल्लीत अदृश्य शक्ती […]

शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

बारामती, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : कुठे अवकाळी पाऊस तर कुठे गारपीट, काही ठिकाणी दुष्काळ अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने या परिस्थितीची दखल घेऊन तातडीने मदत द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे राज्य शासनाने संवेदनशीलतेने बघावे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्राचे कंबरडे मोडण्यासाठी दिल्लीत अदृश्य शक्ती कार्यरत आहेत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पृथ्वीराज चव्हाण मराठा आरक्षणावर काय बोलले ते ऐकले नसल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना, बेरोजगारांना न्याय मिळणार नसेल तर महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number