नाशिक जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी

नाशिक, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीत एकूण नुकसानीचा आढावा घेण्यात आला. तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना लवकर मदत द्यावी, असे निर्देश मंत्री अनिल पाटील यांनी दिले. बैठकीत झालेल्या चर्चेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे राज्यात २६ […]

नाशिक जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी

नाशिक, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीत एकूण नुकसानीचा आढावा घेण्यात आला. तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना लवकर मदत द्यावी, असे निर्देश मंत्री अनिल पाटील यांनी दिले.

बैठकीत झालेल्या चर्चेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे

राज्यात २६ तारखेला जी गारपीट झाली, त्यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले
निफाड तालुक्यात जवळपास ३४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान
अंतिम अहवाल शनिवार पर्यंत येईल, या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता
द्राक्ष, कांदा, टोमॅटो, भात आणि भाजीपाला शेतीचे नुकसान
पंचनामे सुरू, ४ दिवसात पंचनामे होतील आणि आयुक्त अहवाल सादर करतील
पिकविम्यासह अनेक निकष बदलण्याची गरज
फळबाग बाबत निकष बदलले पाहिजे, याबाबत कृषिमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार
येणाऱ्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा विषय ठेवणार, यात मंत्रिमंडळात चर्चा करू
१२ हजार हेक्टर क्षेत्र द्राक्षाचे नुकसान झाले, ११ हजार हेक्टर कांद्याचे नुकसान
७० हजार शेतकऱ्यांचे नुकसान, २ जणांचे मृत्यू झाले आहे
त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू, मृतांपर्यंत मदत पोहचवली जाईल
५० लहान आणि १५ मोठी जनावरे मृत झाली, त्यांनाही मदत केली जाणार आहे
घरांची पडझड झाली, त्यांचेही पंचनामे करण्याचे आदेश दिले
लवकरात लवकर अहवाल देण्याचे आदेश मी दिले आहे
राज्यात १६ जिल्ह्यात गारपिटीचा फटका, ७० ते ८० लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे
सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहे, अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या आहे
मागील ४ महिन्यात सरकारने जाहीर केलेली मदत सुद्धा दिली गेली आहे

उद्धव ठाकरेंवर अनिल पाटील यांची प्रतिक्रिया

ते मुख्यमंत्री असतांना किती दौरे रद्द केले आहेत, याची माहिती महाराष्ट्राला आहे
गारपीट झाली, तिथं सगळे पालकमंत्री पोहचले
ते राज्याबाहेर गेले तरी पंचनामे थांबले नाही

द्राक्ष बागांचे पंचनामे

निफाड तालुक्यातील पूर्व भागातील वेळापूर, शिवडी, निफाड, कसबे सुकेणे, टाकळी, लासलगावसह परिसरात रविवारी दुपारी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसात द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोटावधीचे यात नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी विभागाकडून पंचनामा यांना सुरुवात झाली आहे यात द्राक्ष आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याचे कृषी सहाय्यक सांगत आहेत.

अमरावतीत सकाळपासून पाऊस

अमरावतीत सकाळपासून पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील कपाशी आणि तूर पिकाला फटका बसला आहे कापूस भिजला आहे. तुरीला फटका बसला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number