कोची, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : माजी क्रिकेटपटू आणि चित्रपट कलाकार एस. श्रीसंत याला फसवणूक प्रकरणाच केरळच्या उच्च न्यायालयाने हंगामी जामीन दिला.
एस. श्रीसंत विरोधात कलम ४२० अंतर्गत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सरीश गोपालन यांनी एस. श्रीसंत, राजीव कुमार आणि वेंकटेश किणी यांच्यावर क्रिकेट अकादमीसाठी १८.७० लाख रुपये घेतल्याची तक्रार केली होती. पण राजीव कुमार आणि वेंकटेश किणी यांच्याशी थेट आर्थिक व्यवहार केलेला नाही, तक्रारदार सांगत असलेल्या फसवणूक प्रकरणाशी संबंध नाही, असे एस. श्रीसंत याच्यावतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले. हा मुद्दा मांडताना एस. श्रीसंत याने समर्पक माहिती उच्च न्यायालयासमोर सादर केली. यानंतर उच्च न्यायालयाने एस. श्रीसंत याला हंगामी जामीन दिला.
वादग्रस्त एस. श्रीसंत
एस. श्रीसंत २७ कसोटी, ५३ एकदिवसीय आणि १० वीस – वीस षटकांचे सामने खेळला. तो आयपीएल पण खेळला होता. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोप झाल्यामुळे एस. श्रीसंत अडचणीत सापडला. यानंतर त्याची क्रिकेटमधील कारकिर्द संपली.