सिंधुदुर्ग, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एकेकाळचे कट्टर शत्रू आणि आताचे केंद्रीय मंत्री तसेच राजकीय स्नेही नारायण राणे यांची भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या राणेंच्या घरी ही भेट झाली. केसरकर आणि राणे एकमेकांना तब्बल बारा वर्षांनंतर भेटले. तासाभराच्या भेटीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगार युवकांच्या प्रश्नासह इतर अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. एकेकाळचे राजकीय विरोधक भेटले, तासभर बोलले. यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
दीपक केसरकर आणि नारायण राणे यांची भेट
राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर झाली भेट
डीएड बेरोजगार युवकांच्या प्रश्नावर चर्चा
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासह इतर प्रश्नांवर चर्चा