नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसला. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये पर्वतीय क्षेत्रात हिमवृष्टी झाली तर राज्याच्या इतर भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढली आहे. पुढील दोन – चार दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीची तीव्रता जाणवणार असल्याचा अहवाल भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला. पुणे जिल्ह्यात २६ पैकी २२ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे २२ पाणलोट क्षेत्रांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाली.