जालना, २५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना काही जणांनी पोलिसांवर दडफेक केली होती. पोलिसांवर दगडफेक सुरू झाली नंतर स्थानिक पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकरणात पोलिसांवर दगडफेक करणारा आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्यास कारणीभूत ठरलेला ऋषिकेश बेदरे याला पोलिसांनी अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे दगडफेक करणारा ऋषिकेश बेदरे हा सुप्रिया गटाचा सदस्य आहे. तो सुप्रिया गटाचा तालुका अध्यक्ष आहे. याआधी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व विरोधकांनी आंतरवाली सराटी येथे कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी राज्य शासनाला कारणीभूत ठरवले होते. पण आता कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी सुप्रिया गटाशी संबंधित व्यक्तीचा हात असल्याचे समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
आंतरवली सराटीत दगडफेक करणारा सुप्रिया गटाचा पदाधिकारी
ऋषिकेश बेदरे सुप्रिया गटाचा तालुका अध्यक्ष
ऋषिकेश बेदरे सुप्रिया गटाचा पदाधिकारी