मुंबई, २५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतीय हवामान विभागाने शनिवार २५ नोव्हेंबर आणि रविवार २६ नोव्हेंबरसाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील आठवड्यापर्यंत दक्षिण राजस्थान आणि मध्य प्रदेशात पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात संध्याकाळी अवकाळी पाऊस पडला.