अमरावती, २४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पंकजा मुंडे यांनी जवळचे बघण्यासाठीचा चष्मा लागल्याची माहिती व्हिडीओ करून सोशल मीडियाद्वारे नागरिकांना दिली. हा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडेंचे दुर्दैव आहे की त्या शिंकल्या तरी बातमी होते. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होत आहे; असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पंकजा यांनी व्हायरल व्हिडीद्वारे चष्मा वापरल्यामुळे आता जवळचेही स्पष्ट दिसेल असे सांगितले होते. हे सामान्य वक्तव्य होते की त्याद्वारे कोणाला तरी इशारा द्यायचा होता, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी पंकजा यांचे खूप नुकसान होत असल्याचे सांगितले.