ऋतुराज गायकवाड झाला ‘डायमंड डक’

विशाखापट्टणम, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेल्या वीस – वीस षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी वीस षटकांत तीन बाद २०८ धावा केल्या. भारतापुढे वीस षटकांत २०९ धावा करण्याचे आव्हान ठेवले. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताला पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर धक्का बसला. ऋतुराज गायकवाड ‘डायमंड डक’ झाला. तो शून्य […]

ऋतुराज गायकवाड झाला ‘डायमंड डक’

विशाखापट्टणम, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेल्या वीस – वीस षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी वीस षटकांत तीन बाद २०८ धावा केल्या. भारतापुढे वीस षटकांत २०९ धावा करण्याचे आव्हान ठेवले. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताला पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर धक्का बसला. ऋतुराज गायकवाड ‘डायमंड डक’ झाला. तो शून्य चेंडूत शून्य धावा करून धावचीत झाला.

डायमंड डक म्हणजे काय ?

फलंदाजी करणाऱ्या संघाचे दोन खेळाडू मैदानावर असतात. यापैकी एक फलंदाजी करत असतो आणि दुसरा गोलंदाजाच्या बाजूस क्रीझमध्ये उभा असतो. या दुसऱ्या खेळाडूस नॉन स्ट्रायकर एंड प्लेअर किंवा नॉन स्ट्रायकर एंड बॅटर असे म्हणतात. जर नॉन स्ट्रायकर एंडला असलेला खेळाडू शून्य चेंडूत शून्य धावा करून धावचीत झाला तर त्याला ‘डायमंड डक’ असे म्हणतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number