अजित पवार – कोल्हे भेटले

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी कुणाची यावरून सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या दोन ठिकाणी संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू असताना सुप्रिया गटाच्या खासदारांना अपात्र करण्यासाठी अजित पवार यांच्या गटाने याचिकेतून मागणी केली आहे. या मागणीतून सुप्रिया गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचे नाव वगळण्यात आले आहे. हा बदल झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी […]

अजित पवार – कोल्हे भेटले

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी कुणाची यावरून सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या दोन ठिकाणी संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू असताना सुप्रिया गटाच्या खासदारांना अपात्र करण्यासाठी अजित पवार यांच्या गटाने याचिकेतून मागणी केली आहे. या मागणीतून सुप्रिया गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचे नाव वगळण्यात आले आहे. हा बदल झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पण माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार यांना भेटल्याचे सांगितले.

मागील काही दिवसांपासून खासदार अमोल कोल्हे अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांवर टीका करणे टाळत आहेत. अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळी खासदार अमोल कोल्हे राजभवनातील सोहळ्याला उपस्थित होते. आता खासदार अमोल कोल्हे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवारांची भेट घेतली. यामुळे खासदार अमोल कोल्हे नक्की कोणत्या गटात यावरून चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादी कुणाची ?, शुक्रवारी सुनावणी

निवडणूक आयोगात राष्ट्रवादी कुणाची या संदर्भात शुक्रवारी पुढील सुनावणी आहे. या सुनावणीच्यावेळी अजित पवार गटाचे मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.

मंत्रालयात अजित पवार – कोल्हे भेटले
‘भेटीत विकासकामांबाबत चर्चा केली’
अमोल कोल्हेंच भेटीनंतर स्पष्टीकरण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number