भारत – ऑस्ट्रेलिया आमनेसामने

विशाखापट्टणम, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा सामना जिंकत २०२३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकला. हा सामना झाल्यानंतर आठवड्याच्या आतच भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी – २० सामन्यांची मालिका गुरुवार २३ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना सामना विशाखापट्टणम येथील वायएसआर रेड्डी स्टेडियम येथे […]

भारत – ऑस्ट्रेलिया आमनेसामने

विशाखापट्टणम, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा सामना जिंकत २०२३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकला. हा सामना झाल्यानंतर आठवड्याच्या आतच भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी – २० सामन्यांची मालिका गुरुवार २३ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना सामना विशाखापट्टणम येथील वायएसआर रेड्डी स्टेडियम येथे होणार आहे. हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल.

भारत : ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, ऋतुराज गायकवाड, जितेश शर्मा

ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार आणि यष्टीरक्षक) , टी. हेड , मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस , ग्लेन मॅक्सवेल , मार्कस स्टॉइनिस , टिम डेव्हिड , शॉन अॅबॉट , अॅडम झम्पा , नॅथन एलिस , जेसन बेहरेनडॉर्फ , तन्वीर संघा , ए. हार्डी, केन रिचर्डसन

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वीस – वीस षटकांच्या सामन्यांची मालिका
सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार

गुरुवार २३ नोव्हेंबर २०२३ – वायएसआर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम
रविवार २६ नोव्हेंबर २०२३ – ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुअनंतपुरम
मंगळवार २८ नोव्हेंबर २०२३ – बारसापारा स्टेडियम, गुवाहाटी
शुक्रवार १ डिसेंबर २०२३ – विदर्भ असोसिएशन ग्राउंड, नागपूर
रविवार ३ डिसेंबर २०२३ – एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number