अपात्रता सुनावणी, प्रभूंची उलट तपासणी

मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : विधानभवन येथे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत २१ जूनच्या पक्षादेशावरून सुनिल प्रभू यांची उलटतपासणी सुरू आहे. महेश जेठमलानी ही उलटतपासणी घेत आहेत. काय झालं सुनावणीत पाहुयात जेठमलानी – पक्षप्रमुखांनी लिखित स्वरूपात सूचना केली होती का ?प्रभू – मला आठवत नाही लेखी सूचना […]

अपात्रता सुनावणी, प्रभूंची उलट तपासणी

मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : विधानभवन येथे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत २१ जूनच्या पक्षादेशावरून सुनिल प्रभू यांची उलटतपासणी सुरू आहे. महेश जेठमलानी ही उलटतपासणी घेत आहेत.

काय झालं सुनावणीत पाहुयात

जेठमलानी – पक्षप्रमुखांनी लिखित स्वरूपात सूचना केली होती का ?
प्रभू – मला आठवत नाही लेखी सूचना होती की नाही
जेठमलानी – गोल गोल फिरवू नका, लेखी सूचना केल्या की नाही ?
प्रभू – मी काही गुन्हेगार नाही, अशा बैठका तातडीने घेतल्या जातात तेव्हा फोनवर आदेश दिले जातात
जेठमलानी – जेव्हा पक्षप्रमुखांनी सूचना दिल्या तेव्हा तुम्ही कुठे होता ?
प्रभू – तेव्हा विधानभवनात होतो, पक्ष कार्यालयात तेव्हा आमदार गायब होत असल्याच्या बातम्या येत होत्या
जेठमलानी – पक्षादेश जारी केला तेव्हा सोबत कोणते आमदार होते ?
प्रभू – हे सगळं रेकॉर्डवर आहे, सोबत कोण होतं आठवत नाही

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number