नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना राहुल यांनी मोदींचा उल्लेख करताना असभ्य भाषेचा वापर केला. राहुल यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पनवती म्हटले आहे. राहुल यांच्या वक्तव्याचा भाजपाच्या रविशंकर प्रसाद यांनी निषेध केला. आपण देशाच्या पंतप्रधानांविषयी बोलत आहोत, याचे भान बाळगायला हवे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. राहुल यांची पातळी घसरत चालली आहे, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.