सोनिया, राहुलना ईडीचा दणका

नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने दणका दिला. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने ७५१.९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. एजेएल आणि यंग इंडिया यांची दिल्ली, मुंबई, लखनऊ येथील संपत्ती जप्त करण्यात आली. ईडीने कारवाई केल्याची माहिती ट्वीट करून दिली.

सोनिया, राहुलना ईडीचा दणका

नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने दणका दिला. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने ७५१.९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. एजेएल आणि यंग इंडिया यांची दिल्ली, मुंबई, लखनऊ येथील संपत्ती जप्त करण्यात आली. ईडीने कारवाई केल्याची माहिती ट्वीट करून दिली.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण ?

नेहरूंनी नॅशनल हेरॉल्ड हे नियतकालिक १९३८ मध्ये वृत्तपत्र सुरू केलं.
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड मार्फत नॅशनल हेरॉल्ड प्रकाशित होत असे.
नेहरू आणि ५ हजार स्वातंत्र्य सैनिक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड या कंपनीत भागधारक होते.
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी ‘नॅशनल हेराल्ड’वर ताबा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनी अडचणीत आणून बंद पाडली गेली.
कंपनीच्या नावावर देशभरात मोक्याच्या जागी अनेक भूखंड आहेत.
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीची संपत्ती हडपण्यासाठी गांधींनी डाव टाकला.
सुब्रह्मण्यम स्वामी यांनी हा आरोप करत न्यायालयात धाव घेत अधिकचा खुलासा केला.
गांधींनी यंग इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना नोव्हेंबर २०१०मध्ये केली.
‘यंग इंडिया’त सोनिया आणि राहुल यांचा ७६ टक्के हिस्सा होता.
‘यंग इंडिया’त काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस यांचा प्रत्येकी १२ टक्के वाटा होता.
या दरम्यान, कंपनीला तोटा होत असल्याचे कारण देत ‘एजेएल’ला कॉँग्रेसने ९० कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज दिले.
काँग्रेसकडून अर्थपुरवठा होऊनही मात्र, ‘एजेएल’ कंपनी आणखी तोट्यात दाखवली गेली.
‘एजेएल’ तोट्यात असल्याने तिच्याकडे संपत्ती ‘यंग इंडिया कंपनी’ला दिली गेली.
‘एजेएल’ची दोन हजार कोटींची मालमत्ता फक्त ५० लाखात ‘यंग इंडिया कंपनी’ला दिली गेली.
‘एजेएल’ आणि ‘यंग इंडिया’ भूखंड घोटाळ्यात सोनिया आणि राहुल जामिनावर आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number