मनोज जरांगे पाटलांचे फलक अज्ञाताने फाडले

छत्रपती संभाजीनगर, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगरच्या लासुर स्टेशन येथे लावण्यात आलेले मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा फलक अज्ञात समाजकंटकांनी फाडला आहे. लासुर स्टेशन शिवारातील लासुर स्टेशन ते डोनगाव रोडवरील बाभुळगाव रोड यावरती मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेला गावबंदीचे बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवरील मनोज जरांगे यांच्या फोटो […]

मनोज जरांगे पाटलांचे फलक अज्ञाताने फाडले

छत्रपती संभाजीनगर, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगरच्या लासुर स्टेशन येथे लावण्यात आलेले मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा फलक अज्ञात समाजकंटकांनी फाडला आहे.

लासुर स्टेशन शिवारातील लासुर स्टेशन ते डोनगाव रोडवरील बाभुळगाव रोड यावरती मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेला गावबंदीचे बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवरील मनोज जरांगे यांच्या फोटो अज्ञात इसमाने फाडला आहे. खोडसाळपणा करून हे बॅनर फाडले आहे. या घटनास्थळी शिल्लेगाव पोलिस दाखल झाले आहेत. हा खोडसाळपणा कोणी केला याचा पोलीस शोध घेत असून यामुळे यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.तर मराठा समाजाला आक्रमक झालाय.

यापूर्वी देखील फाडला होता बॅनर…

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरात लावण्यात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर फाडण्याची ही दुसरी घटना असून, यापूर्वी देखील अशाचप्रकारे बॅनर फाडण्यात आले होते. गवळी शिवरा परिसरात मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेला साखळी उपोषणाचा बॅनर चार दिवसांपूर्वी फाडण्यात आले होते. या बॅनरवरील मनोज जरांगे यांच्या फोटो अज्ञात इसमाने फाडला होता. त्यामुळे खोडसाळपणा करून हे बॅनर फाडल्या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number