राज्यात बऱ्याच ठिकाणी दुष्काळ परिस्थिती असून पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाणी मिळणे मुश्कील होणार आहे. महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला दुष्काळाबाबत जे परिपत्रक काढले त्यात चाळीस तालुके घेतले त्यात निकष वेगळे आहेत आणि आता नवीन परिपत्रक काढले त्यामध्ये नवीन तालुके आणि जिल्हे घेतलेले आहे.
मात्र त्यामध्ये सुद्धा गोंधळ आहे सरकारमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांना काही गोष्टी कळणार नाही आमचे सर्वांचे मत असा आहे की एन डी आर एफ याला पाच पट मदत दिली पाहिजे आणि शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया कर्ज जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.