मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : एसटी महामंडळाला नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ३२८ कोटी ४० लाख रुपयांचा महसूल मिळाला. भाऊबीजेच्या दिवशी अर्थात १५ नोव्हेंबरला एसटी महामंडळाला सर्वाधिक ३१ कोटी ६० लाख रुपयांचा महसूल मिळाला. एसटी महामंडळाला पुणे विभागातून नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ८१ कोटी ६१ लाख रुपयांचा महसूल मिळवला. मुंबई महानगर प्रदेशातून एसटी महामंडळाने नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ५५ कोटी २ लाख रुपयांचा महसूल मिळवला. याआधी नोव्हेंबर २०२२ च्या पहिल्या पंधरवड्यात एसटी महामंडळाला २३१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.